सेवा

आम्ही तुमची काळजी कशा प्रकारे घेऊ शकतो ?

आपल्या घरी

आमच्या डॉक्टर्स, नर्स आणि समुपदेशकांची टीम तुम्हाला तुमच्या घरी भेट देईल आणि तुमच्यावर उपचार करणाऱ्या प्राथमिक डॉक्टरांसोबत संवाद साधून वेदना आणि इतर लक्षणांवर संपूर्ण उपचार देईल. रुग्णाच्या आयुष्यातील अंतिम क्षणी समोर असणाऱ्या आव्हानांना संवेदना पूर्वक आणि कार्यक्षमतेने हाताळून, जीवनाचा प्रवास अधिकाधीक सुखकर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
वैद्यकीय अॅपद्वारे काळजी

सध्या विकसित होत असलेल्या वैद्यकीय अॅपचे उद्दिष्ट उपशामक काळजी टीमला तुमच्याविषयी जलद माहिती प्रदान करणे हा आहे, जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमच्या लक्षणांमध्ये आराम देण्यास लवकरात लवकर मदत करू शकू.





तुमच्या लक्षणांचा सतत मागोवा घेणे
अनेक जुनाट आजारांची लक्षणे वेळोवेळी वाढू किंवा कमी होऊ शकतात आमची अँप प्रणाली सतत तुमच्या लक्षणांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत करते जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमच्या लक्षणांपासून त्वरीत आराम देऊ शकतो.
परिचारिकेची भेट
तुमच्याकडे आमच्या नर्सच्या सेवेला कॉल करण्याचा पर्याय आहे, मग ते युरिनरी कॅथेटर बदलणे असो किंवा कोलोस्टोमी बॅग बदलण्याचे प्रशिक्षण देणे असो, आमची परिचारिका फक्त एका क्लिकच्या अंतरावर आहे.
डॉक्टरांची भेट
आमचे डॉक्टर ऑनलाइन सल्लामसलत आणि वैयक्तिक भेटीसाठी उपलब्ध आहेत. त्यांना अॅपद्वारे तुमच्या लक्षणांची माहिती दिली जाते आणि अचानक झालेल्या बदलांबद्दल सूचित केले जाते.
आमचा संघ

आमची टीम आणि तज्ञांना भेटा

डॉ मोहन मेनन

मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि पॅलिएटिव्ह केअर स्पेशालिस्ट

डॉ.कल्पेश आर. जैन

पॅलिएटिव्ह केअर स्पेशालिस्ट आणि फॅमिली फिजिशियन

डॉ.कल्पेश आर. जैन

उपशामक काळजी सल्लागार

© पन्हा. सर्व हक्क राखीव. रचना Portall